वरोरा :- ‘साहित्य सम्राट’ लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वरोरा येथे त्यांना भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊंच्या कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला युवा नेते खुशाल बावणे, भाजपा ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे, ज्येष्ठ समाजसेवक आदेशजी बावणे, शहर अध्यक्ष संतोष पवार, युवा नेते संजय राम, वरोरा नगर परिषदेचे नगरसेवक प्रवीणजी चिमुरकर, किशोर खंडारे, प्रकाश टिपले, मयुर मेहता, जगदीश तोटावार, योगेश बावणे, पंकज जाधव, आकाश निखाळे, विक्की वाघमारे, अजय बावणे, अनिकेत बावणे, बाळकृष्ण खंडारे, विकास खंडारे, अविनाश बावणे, साहिल लंगोटे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि त्यांचे सामाजिक योगदान हे आजही समाजमनाला प्रेरणा देणारे असून, त्यांच्या विचारांचे पाईक होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.




