Home विदर्भ सामूहिक अभ्यास केंद्राला रेखा तेलतुंबडे यांची आकस्मिक भेट; उपक्रमांचे केले कौतुक

सामूहिक अभ्यास केंद्राला रेखा तेलतुंबडे यांची आकस्मिक भेट; उपक्रमांचे केले कौतुक

वरोरा :- स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, वरोरा येथे १५ जुलै रोजी वरोरा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा तेलतुंबडे यांनी आकस्मिक भेट देत अभ्यास केंद्रातील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.




यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या , दैनंदिन दिनचर्या तसेच केंद्रात मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेली शिस्त, अभ्यासाची आवड आणि सकारात्मक वातावरणाचे त्यांनी कौतुक केले.




भेटीदरम्यान अभ्यास केंद्रात नियमितपणे राबविण्यात येणारे योग प्रशिक्षण, सामुदायिक प्रार्थना, स्पोकन इंग्लिश वर्ग पाहून रेखा तेलतुंबडे यांनी समाधान व्यक्त केले. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.




यावेळी संस्थेचे सचिव आशिष घुमे यांनी अभ्यास केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच आगामी नियोजनाची माहिती दिली. योग शिक्षिका शीतल मिटकर*यांनी योग प्रशिक्षणाबाबत, तर गो विथ स्ट्रक्चर’ चे गोपाळ गुडधे यांनी स्पोकन इंग्लिश वर्गाविषयी माहिती दिली.




या प्रसंगी चेतन बुरडकर, नूतन बुरडकर, सार्थक नागपुरे यांच्यासह अभ्यास केंद्राचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.