वणी :- समाजाच्या प्रगतीचा पाया हा शिक्षणात आहे, हे ओळखून ‘माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणी’ (नोंदणी क्र.: यवतमाळ/००००४३०/२०२५) आपल्या समाजातील नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी‘चे औचित्य साधून, वणी तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा एक भव्य ‘सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
समाजातील १० वी व १२ वीच्या परीक्षेत ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांची दखल घेत, त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या कर्तृत्वाने समाजाची मान उंचावणाऱ्या या गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहित करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.
🙏 विद्यार्थ्यांसाठी आवाहन 🙏
ज्या विद्यार्थ्यांनी १० वी व १२ वीच्या परीक्षेत ७५% हून अधिक गुण संपादन केले आहेत, त्यांनी आपली नावे त्वरित नोंदवावीत. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
संपर्क क्रमांक :- ☎️ ९९२२८६१४७६, ☎️ ९९२२६०३३३२, ☎️ ९२८४२५९४३९, ☎️ ७३५०८५७४८७
समाजाच्या भावी पिढीच्या यशाचा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे!




