Home Breaking News चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या घोषणेवरून खळबळ

चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या घोषणेवरून खळबळ

चंद्रपूर :- चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, यावरून पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताना स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.




अंतर्गत कलह :- ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्याच्या प्रक्रियेत वरिष्ठांनी स्थानिक आमदारांना विचारात घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.




कारवाईची मागणी :- या प्रकारामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध करत, कार्यकारिणीला स्थगिती देण्याची मागणी लावून धरली आहे.




पक्षश्रेष्ठींची भूमिका :- या वादामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता पक्षश्रेष्ठी  नी यावर  निर्णय घेत महाराष्ट्र  भा ज पा चे प्रदेशाध्यक्ष   रवींद्र चव्हाण यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे.
या घटनेमुळे आगामी काळात चंद्रपूर भाजपमधील गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.