मारेगाव :- मनसे कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम;
पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात मारेगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते विचारपीठ मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मारेगाव तालुका मनसेच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. नेहमीच्या राजकीय घोषणाबाजीला आणि अवाजवी खर्चाला फाटा देत, मनसे सैनिकांनी थेट जनतेच्या सेवेलाच खरा उत्सव मानले. मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि राजसाहेबांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
जनतेची सेवा हाच पक्षाचा खरा ‘अजेंडा’!
“नेत्याने जनतेच्या सुखादुःखात धावून जावे,” हाच विचार राजसाहेबांनी नेहमी मांडला आहे. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मारेगाव तालुका मनसेने हा उपक्रम हाती घेतला होता. ग्रामीण रुग्णालयातील सामान्य आणि गरीब कुटुंबातील रुग्णांना सकस आणि ताजी फळे वितरित करण्यात आली. केवळ औपचारिकता म्हणून फळवाटप न करता, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक रुग्णाच्या खाटेपाशी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली, डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि ते लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सेवाभावी उपक्रम नियोजित करण्यात आला होता. या संवेदनशील सामाजिक उपक्रमाला मनसेच्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली. यामध्ये प्रामुख्याने:
जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ रोगे तालुकाध्यक्ष रूपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे,
शेख नबी, किशोर मानकर, रोशन शिंदे, उदय खिरटकर, अमोल कास्तवार, विष्णू काळे, राजू आसकर, आकाश खामणकर, राजू तुराणकर आणि गौरव सोयाम यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Breaking News राजसाहेबांच्या वाढदिवसाला ‘सेवाकार्याचा’ जागर; मारेगाव ग्रामीण रुग्णालयात मनसेकडून रुग्णांना फळवाटप!




