Home Breaking News वणीत ‘मनसे’ची मोठी मुसंडी; राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन असंख्य युवकांचा जाहीर...

वणीत ‘मनसे’ची मोठी मुसंडी; राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन असंख्य युवकांचा जाहीर प्रवेश!

वणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या धडाडीच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच मनसेचे खंबीर नेते सन्माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज वणी शहरातील असंख्य युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) झेंडा हाती घेतला. या धडाकेबाज पक्षप्रवेशामुळे वणीच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सध्या तालुक्यातील युवकांचा कल स्पष्टपणे मनसेकडे झुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पक्षाची ध्येयधोरणे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वणीच्या विकासात आपला वाटा उचलण्यासाठी आज पवन पारशीवे, पवन बुऱ्हाण, गोलू पारशीवे, रितेश पचारे, वैभव केळवडे, चेतन ढेंगडे, सोहम टेकाम, अभिषेक टेकाम, अभिषेक बदकी आणि अर्जुन वैद्य यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व नवप्रवेशित युवकांचे मनसेचा अधिकृत दुपट्टा गळ्यात घालून पक्षात सहर्ष स्वागत केले.
या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धीरज पिदुरकार, लकी सोमकुवर, मनोज उरकुडे, अविनाश पाटील, विलन बोदाडकर, गौरव बोबडे, प्रशांत टोरे आणि विशाल सोमटकर यांच्यासह मनसेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राजसाहेबांचे महाराष्ट्राच्या हिताचे विचार आणि राजूभाऊ उंबरकर यांनी वणी मतदारसंघात सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य पाहून आम्ही पक्षात प्रवेश केला आहे,” अशा भावना यावेळी नव्याने दाखल झालेल्या युवकांनी व्यक्त केल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे वणी आणि परिसरात मनसेची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात मनसे तरुणांच्या बळावर स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.