वरोरा:- ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असा माणुसकीचा संदेश देणारे थोर साहित्यिक आणि समाजसुधारक साने गुरुजी यांची पुण्यतिथी आज अरविंद विद्यानिकेतन, वरोरा येथे अत्यंत आदराभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंटच्या संचालिका डॉ. सौ.माया रमेश राजूरकर यांची उपस्थिती होती. डॉ.सौ. माया रमेश राजूरकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी साने गुरुजींच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. साने गुरुजींचे साहित्य आणि त्यांचे संस्कार नवीन पिढीसाठी आजही तितकेच मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन उपस्थितांकडून करण्यात आले.
या कार्यक्रमास अरविंद विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक गुरुदेव जुमडे , बावणे सर, मनीषा ठेंगणे, रुबीना शेख, किरण आडकिने, विनोद गिरसावळे, प्रवीना पारधे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करून या कार्यक्रमाची सांगता झाली.




