Home Breaking News अहमदाबाद विमानतळावर आयसिसचे चार दहशतवादी ताब्यात

अहमदाबाद विमानतळावर आयसिसचे चार दहशतवादी ताब्यात

हमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे सोमवारी इसिसशी संबंधित चार दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. गुजरात एटीएसने अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून या चौघांना अटक केली.या दहशतवाद्यांची ओळख अजून समोर आलेली नाही. मात्र, या चौघांचे श्रीलंका तसेच पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही दहशतवादी अहमदाबादला येणार असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. ती माहिती त्यांनी गुजरात एटीएसला दिली. हे दहशतवादी इसिसशी संबंधित असल्याचेही त्यांना सांगितले होते. तर हे दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक असल्याचे सांगितले जात आहे.

या चारही दहशतवाद्यांना गुजरात एटीएसने ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञात स्थळी नेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. दहशतवादी काय उद्देशाने अहमदाबाद विमानतळावर उतरले, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या चौघांकडे जे तिकीट मिळाले आहे, त्यानुसार हे चौघेही चेन्नईवरून अहमदाबादला आले आहेत. इसिसचे हे दहशतवादी कोलंबो येथून तामिळनाडू आणि तामिळनाडूवरून अहमदाबादला पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही विमानतळावर आपल्या पाकिस्तानातील बॉसच्या आदेशाची वाट त होते. हे दहशतवादी शस्त्रांची प्रतीक्षा करत होते. मात्र, ती शस्त्रे घेण्यापूर्वीच त्यांना एटीएसने अटक केली आहे.

या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर संपूर्ण विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलचे तीन संघ अहमदाबादमध्ये पोहोचण्यापूर्वी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात इसिसच्या दोन महत्त्वाच्या दहशतवाद्यांना बांगलादेशची सीमा ओलांडत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक करण्यात आले होते. तसेच गेल्या महिन्यात गुजरात एटीएस आणि एनसीबीने गुजरातच्या पोरबंदर येथून 14 पाकिस्तानींना पकडले होते. त्यांच्याकडून 602 कोटी रुपये तसेच 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.