Home जिल्हा भाजपाचे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ संपन्न; कार्यकर्त्यांना मिळाले सक्रीय कार्याचे बळ

भाजपाचे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ संपन्न; कार्यकर्त्यांना मिळाले सक्रीय कार्याचे बळ

वरोरा :-  भारतीय जनता पार्टी, खंबाळा-सालोरी मंडळातर्फे आयोजित दोन दिवसीय ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ वरोरा तालुक्यातील चिकणी येथील विठ्ठल मंदिर देवस्थान हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले. १७ आणि १८ एप्रिल रोजी झालेल्या या महाअभियानात भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षविचारधारेचे बाळकडू आणि आक्रमकतेचा मंत्र देण्यात आला.
आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
या महाअभियानाचे उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. करणदादा देवतळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार देवतळे यांनी कार्यकर्त्यांना पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आणि जनकल्याणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
👉 वैचारिक मंथन आणि सात सत्रांचा धडाका
दोन दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरात एकूण सात सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी श्री. गुरुदास कामडी यांनी पक्षाचा गौरवशाली इतिहास मांडून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. १८ एप्रिलची सुरुवात पहाटे ७ वाजता योग आणि व्यायामाने झाली, ज्यामुळे कार्यकर्त्यांची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उंचावली. त्यानंतर सकाळच्या सत्रात श्री. संजय गजपूरे, तनय देशकर आणि साकेतजी भानारकर यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
👉 दिग्गजांची उपस्थिती आणि उत्तम नियोजन
जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या सूचनेनुसार आणि आमदार करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अभियानात डॉ. विजयजी देवतळे, मंडळ अध्यक्ष राजेंद्र सवाई, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज धात्रक, अभियान प्रमुख विजयजी मोकाशी (अध्यक्ष वरोरा तालुका खरेदी विक्री संस्था ) यांच्यासह बाळासाहेब भोयर, राजूजी लडके, चंद्रशेखर नौकरकर, योगेश खिरटकर, धीरज दारुंडे, संदीप बरबटकर, प्रकाश झाडे, दिवाकर नन्नावरे, आकाश भांडे, गजानन येळेकर, बंडुजी दातारकर, सुनील येरेकर, राजू येरेकर, भानुदास निकुडे, विकास चौधरी, नरेंद्र माथाणकर, भोजराज असुटकर आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज धात्रक यांनी केले, तर प्रास्ताविक राजेंद्र सवाई यांनी मांडले. उपस्थितांचे आभार योगेश खिरटकर यांनी मानले. या प्रशिक्षण महाअभियानामुळे खंबाळा-सालोरी मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, येणाऱ्या काळात पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

🙏 जय विदर्भ 🙏