Home राजकारण देशातील लाखो कुटुंबांच्या स्वयंपाकघरात आज गॅस नसल्याने चूल थंड पडण्याची वेळ आली...

देशातील लाखो कुटुंबांच्या स्वयंपाकघरात आज गॅस नसल्याने चूल थंड पडण्याची वेळ आली आहे.

 

नवी दिल्ली 😐 संसद भवन

देशभरात निर्माण झालेल्या स्वयंपाक गॅसच्या भीषण तुटवड्याच्या मुद्द्यावर आज संसदभवन परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडले. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत खासदारांनी सरकारला थेट जाब विचारला आणि तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. यात विशेष म्हणजे चंद्रपूर – आर्णी लोकसभेचे लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला की यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांमुळे देशभरात एलपीजी गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, लघुउद्योजक आणि छोट्या व्यावसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.

देशातील लाखो कुटुंबांच्या स्वयंपाकघरात आज गॅस नसल्याने चूल थंड पडण्याची वेळ आली आहे. अनेक शहरांमध्ये नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासूनच लांबलचक रांगा लावाव्या लागत असून प्रशासन मात्र परिस्थितीकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

संसद परिसरात झालेल्या या संतप्त आंदोलनामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. जनतेच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी हा लढा संसदेतच नव्हे तर रस्त्यावरही अधिक तीव्र करण्यात येईल, असा थेट इशारा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला दिला.

🙏जय विदर्भ🙏