Home जिल्हा ⭕🙏 भटाळा येथे महाशिवरात्री निमित्त सामाजिक एकात्मतेचा संदेश 🙏⭕

⭕🙏 भटाळा येथे महाशिवरात्री निमित्त सामाजिक एकात्मतेचा संदेश 🙏⭕

भटाळा येथे महाशिवरात्री निमित्त सामाजिक एकात्मतेचा संदेश

शिव मंदिर, भटाळा येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्राचीन मंदिरात उपस्थित राहून देवाधिदेव महादेवाचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.

या प्रसंगी चंद्रपूर-आर्णी च्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर व वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.

महाशिवरात्री हे केवळ धार्मिक पर्व नसून समाजाला एकत्र आणणारा, सकारात्मकता व सेवाभाव जागवणारा सण आहे. मंदिर परिसरात भक्तांनी शिस्तबद्ध दर्शन घेत सामाजिक जबाबदारीचे भान राखले. “भगवान भोलेनाथ समस्त नागरिकांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी देवो, तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभो,” अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

या निमित्ताने समाजात बंधुभाव, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ व्हावी, असा संदेश देत सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.