हिंगणघाट (जि. वर्धा) येथील निखाडे सभागृह, नंदोरी रोड येथे खैरे कुणबी समाज युवा मंच, हिंगणघाट – समुद्रपूर तालुका यांच्या वतीने आयोजित उप-वर वधू परिचय मेळावा व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे होते. उद्घाटक म्हणून अशोक शिंदे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व सुभाष धोटे (माजी आमदार, राजुरा विधानसभा) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप वादाफळे (अध्यक्ष, विघ्नहर्ता ग्रामविकास संस्था, यवतमाळ), राजू पाटील झाडे (माजी सभापती, पं. स. चिमूर), महेशजी पाटील झोटिंग, महादेवरावजी वैद्य (मुख्य संघटक, खैरे कुणबी समाज, पश्चिम नागपूर), अमितजी चाफळे, नितीनजी कुकडे, साहेबराव जुनघरे (अध्यक्ष, खैरे कुणबी समाज, जिल्हा यवतमाळ), संगीता श्रीकांत बढे (अध्यक्षा, रणरागीणी मंच, महाराष्ट्र), हरिहर पेंदे (ज्येष्ठ शिल्पकार), स्वप्नील रोहनकर (अध्यक्ष, विदर्भ खैरे कुणबी विवाह मंच), अंकुश पिंपरे (कोषाध्यक्ष, संत सखुमाई संस्था, वर्धा), रिनाजी विजयराव धंदरे (जिल्हाध्यक्ष, महिला खैरे कुणबी, यवतमाळ) यांच्यासह गंगाधररावजी कोल्हे, राजूपाटीलजी चाफळे, वसंतरावजी पाल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील युवक-युवतींना एक सुसंवादी व विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. समाजातील एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रत्यय देणारा हा उपक्रम ठरला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक खैरे कुणबी समाज युवा मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
🙏जय विदर्भ 🙏🏻
बतमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.☎9673574711☎️8329889732




