वरोरा : अभिषेक भागडे
वरोरा नगरपरिषद अंतर्गत आरोग्य विभागामार्फत जिल्हा नगरोत्थान निधीतून सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या कंपाउंड वॉल बांधकामात गंभीर अनियमितता, निकृष्ट काम व नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे नगरसेवक अक्षय दिलीप भिवदरे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
सदर कामासाठी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित कंत्राटदार कंपनीला १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. करारानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही काम सुरू न होणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अक्षय भिवदरे यांनी नमूद केले आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, सदर प्रकल्पात कामाची गुणवत्ता, सुरक्षितता व शासकीय निकष पूर्णपणे डावलले गेले असून शासन नियमांचे उघड उल्लंघन होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकल्पात अशी बेफिकीर व बेजबाबदार कार्यपद्धती अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, कंत्राटदार कंपनीला पाठीशी घातले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन करणार नाही, असा ठाम इशाराही भिवदरे यांनी दिला आहे.
या प्रकरणी नगरसेवक अक्षय भिवदरे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत –
1. घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या आवारातील कंपाउंड वॉलचे काम तात्काळ थांबवण्यात यावे.
2. संबंधित कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत (Blacklisted) टाकण्यात यावे.
3. सदर कंत्राट तात्काळ रद्द (फेरनिविदा) करण्यात यावे.
4. कामास मान्यता देणाऱ्या व दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी तर याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा भाजप नगरसेवक अक्षय दिलीप भिवदरे यांनी दिला आहे. व वरील मागण्यांवर तात्काळ निर्णय न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, तसेच सदर प्रकरण उच्चस्तरीय चौकशीसाठी शासनदरबारी मांडण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी.
तरी सदर बाब अत्यंत गंभीर असून, विलंब न करता तातडीने ठोस कार्यवाही करण्यात यावी.
आपले नगरसेवक
1. श्री. अक्षय दिलीप भिवदरे , नगरसेवक तथा गटनेता( भा. ज. पा.)
2. श्री. संतोष पवार नगरसेवक तथा ( भाजप शहराध्यक्ष )
3. श्री. प्रविण चिमुरकर, नगरसेवक
4. खेमराजजी कुरेकर नगरसेवक
5. श्री. कुणाल रुयारकर नगरसेवक
6. श्री. शंभुनाथजी वरघने स्वीकृत नगरसेवक
7. सौ. नलिनी आत्राम नगरसेविका
8. सौ. वर्षा पिसाळ नगरसेविका
9. सौ. लिना गायनेवार नगरसेविका
10. सौ. आशा आसेकरक नगरसेविका
11. सौ. मनीषा सजय दानव नगरसेविका
12. सौ. सिमा सचिन तडस नगरसेविका
13. सौ. लता हिवरकर नगरसेविका
14. सौ. नुपुर तेला, नगरसेविका, भरत तेला,अमित आसेकर व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




