यशस्वी बावणेची भरारी; जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात दुहेरी यश
वरोरा : -✍️ अभिषेक किशोरराव भागडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित “आगाज – सुरुवात नव्या पर्वाची” या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशश्री बावणे हिने उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले आहे.
या महोत्सवातील बुद्धिबळ (मुली) स्पर्धेत यशश्रीने प्रथम क्रमांक पटकावला, तर कॅरम (मुली) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या कौशल्याची छाप पाडली. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
यशश्रीचे वडील अनंता बावणे व आई वर्षा बावणे हे दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलीच्या शिक्षणाला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले. यशश्री सध्या कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असून, अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही ती सातत्याने प्रगती करत आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️9673574711
☎️8329889732




