Home राजकारण ⭕🙏 चंद्रपूर काँग्रेसमधील त्या 2 टक्क्याच्या सुभेदारीचा अत होणार कधी...

⭕🙏 चंद्रपूर काँग्रेसमधील त्या 2 टक्क्याच्या सुभेदारीचा अत होणार कधी ?🙏⭕

चंद्रपूर काँग्रेसमधील ‘त्या’ दोन टक्क्यांच्या सुभेदारीचा अंत होणार कधी?

विधवा महिला खासदाराविरोधातील कटकारस्थानांना आता चोख उत्तर मिळणार

चंद्रपूर : – अभिषेक भागडे

शून्यातून विश्व उभारून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला नवी दिशा देणारे दिवंगत खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबाचा छळ थांबलेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. पक्षाच्या जीवावर स्वतःची राजकीय दुकानदारी चालवणारे स्वपक्षातीलच काही ‘दोन टक्के’ स्वयंघोषित नेते आजही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण करत आहेत. बाळूभाऊ हयात असताना ज्या प्रवृत्तींनी त्यांना त्रास दिला, त्याच प्रवृत्ती आज एका विधवा महिलेचे राजकीय अस्तित्व संपवण्याच्या नादाला लागल्या आहेत.

स्वपक्षातूनच विरोध, अंतर्गत गटबाजी आणि गद्दारीचा सामना करत असतानाही, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लोकसभेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे तब्बल २ लाख ५० हजार मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून विरोधकांना करारी उत्तर दिले. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा फडकावत त्यांनी आपली संघटनात्मक ताकदही सिद्ध केली. जनतेचा स्पष्ट कौल मिळूनही, स्वतःला ‘महानेते’ समजणाऱ्या या दोन टक्के नेत्यांचा अहंकार अजूनही शमत नसल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक असताना पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, याच काळात एका ‘बांडगूळ’ प्रवृत्तीच्या नेत्याने गटबाजीचे विष पेरून पक्षाचे खच्चीकरण सुरू केले आहे. स्वतःचा गट वाढवण्यासाठी दुसऱ्या गटातील ५ नगरसेवक फोडण्यापर्यंत या नेत्याची मजल गेली आहे. काँग्रेस कमकुवत करण्यासाठी आणि खासदार प्रतिभाताईंची राजकीय कोंडी करण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करण्यासही हे नेते मागेपुढे पाहत नसल्याची चर्चा उघडपणे होत आहे. ही प्रवृत्ती म्हणजे चंद्रपूरच्या राजकारणाला लागलेली घातक कीड आहे.

महाराष्ट्र हे शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. अशा राज्यात १०० टक्के ओबीसी असलेल्या एका विधवा महिला लोकप्रतिनिधीला केवळ स्वतःची राजकीय सुभेदारी टिकवण्यासाठी त्रास देणे, ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. चंद्रपूर हे कार्यक्षेत्र नसतानाही येथे लुडबूड करून बहुजन नेतृत्वाची गळचेपी करणाऱ्या या प्रवृत्तींचा मुखवटा आता उतरवण्याची वेळ आली आहे.

स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या या ‘दोन टक्के’ सुभेदारांना आता चंद्रपूरकर चोख धडा शिकवतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. जनतेचा कौल, बहुजनांचा आवाज आणि सत्याची बाजू हीच खरी ताकद असून, अशा कारस्थानी राजकारणाचा अंत निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

🙏🏻 जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732