Home Breaking News वरोरा-भद्रावतीत भाजपचा विजयपथ अधिक मजबूत; युवा आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक...

वरोरा-भद्रावतीत भाजपचा विजयपथ अधिक मजबूत; युवा आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवरांचा प्रवेश

वरोरा(अभिषेक भागडे ) :- वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा व लोकप्रिय आमदार करण संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला नवे बळ लाभले आहे. नागपूर येथे १३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीदरम्यान अनेक मान्यवर व अनुभवी लोकप्रतिनिधींनी भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश केला.या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नव्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे, उपेंद्र कोठेकर आणि रमेश राजूरकर हे मान्यवर उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री स्व. दादासाहेब देवतळे यांचे सुपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा चे सभापती डॉ. विजय देवतळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैन्हया जयस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती जयस्वाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गुणवंत भोयर, गट ग्रामपंचायत बोर्डा सरपंच राहुल ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध वकील जयंत ठाकरे, माजी नगरसेवक विठ्ठल टाले, माजी नगरसेवक लोकेश पांढरे, राजू झापर्डे, राममंदिर महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंभूनाथ वरघने, माजी सभापती पंचायत समिती वरोरा राजेंद्र देवतळे, डॉ. रतन बाला, संदीप दिडमिशे, सोमदेव कोहाड, अजय ठाकरे, मंदा तराळे, नरेंद्र भोयर, रवी डवरे, शरद यादव, इकबाल शेख, ह्यानी शेख, स्वाती भोयर, विनोद लांबट, बंडू डोंगरे, माया डोंगरे व जयश्री ठाकरे यांचा समावेश आहे.
या सर्वांनी आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत, पक्षाच्या धोरणांना हातभार लावण्याची आणि क्षेत्रातील जनतेसाठी कार्य करण्याची तयारी दर्शवली.
आमदार करण देवतळे यांनी या वेळी बोलताना सांगितले की,भाजप हा विकास आणि जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे. आज आपल्या वरोरा-भद्रावती क्षेत्रातील अनेक अनुभवी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक सबळ आणि जनतेशी जवळीक साधणारा बनेल.


या भव्य पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच फायदा होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. देवतळे यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक बळामुळे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला म्हणून अधिक मजबूत होईल, असेही बोलले जात आहे.