Home Breaking News Maharashtra winter Session 2024:’या’ तारखेपासून सुरु होणार हिवाळी अधिवेशन

Maharashtra winter Session 2024:’या’ तारखेपासून सुरु होणार हिवाळी अधिवेशन

'या' तारखेपासून सुरु होणार हिवाळी अधिवेशन
green-session-will-start-from-this-date

सत्ता स्थापनेनंतर 10 दिवसात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त

मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर येत्या तीन दिवसात म्हणजेच गुरुवारी नवं सरकार स्थापन होणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला १६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे . पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे . यंदा आमदारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले असून डिजिटल आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

नवीन महायुती (Mahayuti) सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असणार आहे.सरकार स्थापन झाल्यानंतर ऐनवेळी तयारी करणं शक्य नसल्यानं आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे.या हिवाळी अधिवेशनात विशेष म्हणजे आमदारांना फायलींचं ओझं कमी होणार आहे. विधानसभा सभागृहात आमदारांच्या आसनासमोर सभागृहाच्या दैनंदिन कामकाजासह इतर माहिती देणारी डिजीटल स्क्रीन बसवण्यात येत आहे.ज्यामुळे आमदारांना सभागृहाच्या कामात सहभागी होताना सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येणार आहे.विधानपरिषद च्या आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे.

Vespucci mumbai
Mumbai cm
Mumbai City
Mumbai Indian
Mumbai map
Mumbai Pin Code
Mumbai Indians players
Mumbai population