Home राजकारण रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी

रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी

राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी

नागपूर (Nagpur) :- रामटेक विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय.

भास्कर जाधव म्हणाले की, रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांनी बंडखोरी केलीय, याची मला वेदना होतेय. काँग्रेसची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई करायला हवी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीमागे इथल्या काँग्रेस नेत्याचा हात आहे, असा आरोप त्यांनी सुनील केदार यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.

Nagpur today
Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
Nagpur map
Nagpur which state
NMC Nagpur
Index number for property tax Nagpur
Nagpur in which state in Map