Home जिल्हा Prime Minister Narendra Modi : जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण

Prime Minister Narendra Modi : जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण

Prime Minister Narendra Modi : जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण
prime-minister-narendra-modi-completed-10-years-of-jan-dhan-yojana

खात्यांची एकूण संख्या ५३.१३ कोटींच्या घरात

पंतप्रधान जनधन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. (Prime Minister Narendra Modi) मागील दशकभरात या योजनेतून देशभरात एकूण ५३.१३ कोटी जनधन खाती विविध बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. अर्थ मंत्रालयाने बुधवारी याबाबत ही माहिती दिली. जनधन खात्यांमध्ये जमा असलेली एकूण रक्कम आता २,३१,२३६ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या खात्यांवर यूपीआय आधारित पेमेंट मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मध्ये खात्यांवर झालेल्या डिजिटल व्यवहारांची संख्या २,३३८ कोटी इतकी होती. हीच संख्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात १६,४४३ कोटींच्या घरात पोहोचली आहे.

१४ ऑगस्ट २०२४ रोजी जनधन खात्यांच्या संख्येत ३.६ पट वाढ झाली असून या खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम १५ पटींनी वाढली आहे.
– दहा वर्षांपूर्वी या खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम सरासरी ४,३५२ रुपये इतकी होती. तीच रक्कम आता चार पटींनी वाढली आहे.
– या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ३६.०६ कोटींपेक्षा अधिक रुपे डेबिट कार्ड देण्यात आली आहेत. ८९.६७ लाख पीओएस केंद्राची स्थापना करण्यात आली.

आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. मी जनधन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देतो. (Nirmala Sitharaman) योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. जनधन योजनेने देशातील कोट्यवधि गोरगरीब बंधू-भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे.

या योजनेमुळे बँकिग सेवांपासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत बचत खाते, विमा, कर्ज आदी आर्थिक सुविधा पोहचल्या आहेत. यामुळे मागील दशकभरात देशातील बँकिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. याद्वारे ३६ कोटींहून अधिक रुपे कार्ड मोफत दिली आहेत. २ लाखांची विमा सुरक्षा या खात्याद्वारे दिली जात आहे.

Narendra Modi salary
Narendra Modi age
Full name of Narendra Modi
Narendra Modi family
Narendra Modi son
Narendra Modi wife and children
Prime Minister of India
Narendra Modi Photo Gallery