Home विदर्भ ‘यांच्या’ संकल्पनेतून भव्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

‘यांच्या’ संकल्पनेतून भव्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नागपूर (Nagpur) :- नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी एक भव्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री. विकास काका ठाकरे (Vikas Thackeray) ,आमदार तथा जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, नागपूर आणि पूजा निर्मला प्रमोद मनमोडे, अध्यक्ष अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात रक्तदाब, साखर, नेत्र तपासणी, मुलांची तपासणी (१५ वर्षांपर्यंत), ईसीजी, ऑर्थो सर्जरी यासह विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय, सरकारी दवाखान्यातील तज्ञ डॉक्टरांनीही या शिबिरात सहभाग घेतला.

शिबिरात प्राथमिक तपासणीत कोणतीही समस्या आढळून आल्यास, रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पूजा मनमोडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, समाजसेवा हीच ईश्वरसेवा असून, गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हनुमान मंदिर समाज सभागृह, आझम शहा उच्च प्राथमिक शाळा, शिव नगर, नंदनवन येथे आयोजित या शिबिरात शिवनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. लहान मुले ते वृद्ध, सर्वच वयोगटातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Nagpur is famous for
NMC Nagpur property tax receipt
Nagpur Municipal Corporatio
Index number for property tax Nagpur
Nagpur area
Nagpur which state
NMC property tax Nagpur online
Nagpur in which state in Map