Home महाराष्ट्र Maharashtra politics : जळगावच्या अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

Maharashtra politics : जळगावच्या अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

Maharashtra politics : जळगावच्या अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
Maharashtra politics : Anil Deshmukh

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब  

जळगाव (Jalgaon) :- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ जेलमध्ये राहावं लागलं आहे. यानंतर आता अनिल देशमुख यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर (Anil Deshmukh) आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी आपल्याला धमकी दिली होती, असा मोठा आरोप प्रवीण मुंढे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा धक्कादायक आरोप प्रवीण मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्ह्यात अडकवण्याच्या आरोप प्रकरणात महाविकास आघाडी सरकार काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Girish Mahajan) या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचादेखील जबाब सीबीआयकडून नोंदवला गेला होता. मुंढे यांनी आपल्या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे राजकारण तापण्याची जास्त शक्यता आहे.

Jalgaon in marathi
Jalgaon wikipedia
Jalgaon District Information
Jalgaon map
Jalgaon Collector List
Jalgaon district area
Jalgaon comes in which District
Jalgaon district Taluka List