Home Breaking News Ambanis wedding : VVIP मंडळींची मांदियाळी

Ambanis wedding : VVIP मंडळींची मांदियाळी

Ambanis wedding
Ambanis wedding

विविध राज्यांचे मुख्यमंत्री लावणार हजेरी

मुंबई (mumbai):- देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यात राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यातविविध पक्षांच्या नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडणार आहे. त्याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. गुजरातमधील जामनगरमध्ये आणि परदेशात क्रूझवर प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. आता, या दोघांच्या ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश अंबानी यांनी आमंत्रण दिले आहे.

 

https://en.wikipedia.org/wiki/Wedding_of_Anant_Ambani_and_Radhika_Merchant

Ambanis weddingAnant Ambani wedding date
Anant Ambani wedding pictures
Anant Ambani wedding date and year
Anant Ambani pre wedding date
Anant Ambani wedding cost
Anant Ambani wedding venue
Anant Ambani wedding video
Anant Ambani age