Home जिल्हा “भक्ती, संस्कृती आणि हिंदुत्वाचा अढळ वसा: वरोऱ्याचे ‘नवरंग गणेश मंडळ’ साजरं करत...

“भक्ती, संस्कृती आणि हिंदुत्वाचा अढळ वसा: वरोऱ्याचे ‘नवरंग गणेश मंडळ’ साजरं करत आहे ४५ वं गौरवशाली वर्ष!”

वरोरा :- सन १९८२ मध्ये रामदेवबाबा मंदिर परिसरात स्थापन झालेले वरोऱ्यातील अत्यंत प्रतिष्ठित ‘नवरंग गणेश मंडळ’ यंदा आपले ४५ वे वर्ष अत्यंत दिमाखात साजरे करत आहे. गेली चार दशकं हे मंडळ केवळ एक उत्सव म्हणून नव्हे, तर भक्ती, संस्कृती आणि हिंदुत्व यांचा अखंड वसा जोपासत वरोऱ्याच्या सांस्कृतिक पटलावर तेजाची नवी ओळख निर्माण करत आहे.

आजच्या काळात सांस्कृतिक अस्मिता आणि धर्माभिमान जागृत ठेवण्यात नवरंग गणेश मंडळाने नेहमीच अग्रगण्य भूमिका बजावली आहे. रामदेवबाबा मंदिर परिसराला लाभलेला या मंडळाचा उत्सव म्हणजे वरोरावासीयांसाठी केवळ आनंदाचा सोहळा नसून, तो अभिमानाचा महामेरू ठरला आहे. यंदाच्या ४५ व्या  मंडळाच्यावतीने विशेष धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, तरुणांचा जोश आणि शिस्तबद्ध आयोजन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरत आहे.