Home जिल्हा श्री मित्र गणेश मंडळ, गांधी वार्ड, मित्र चौक, वरोरा येथे भव्य रक्तदान...

श्री मित्र गणेश मंडळ, गांधी वार्ड, मित्र चौक, वरोरा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.४८ व्या वर्षात पदार्पण करत ५२ रक्तदात्यांचा सहभाग!

वरोरा (मित्र चौक):- सामाजिक उपक्रमांची उज्ज्वल परंपरा असलेल्या श्री मित्र गणेश मंडळ, गांधी वार्ड, मित्र चौक, वरोराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत, मंडळाला ४८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या विशेष शिबिरात परिसरातील नागरिकांनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.



🙏 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये 🙏
विशेष सहकार्य: सदर शिबिराचे आयोजन लाईफ ब्लड बँक, रामदासपेठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.
आकर्षक भेटवस्तू व सन्मान :- रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल रक्तदानाचे अधिकृत प्रमाणपत्र, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग आणि स्नॅक्स वाटप करण्यात आले.
सामाजिक संदेश: आरोग्य रक्षणासाठी आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम
मंडळाचे अध्यक्ष त्रिशूल घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

सक्रिय कार्यकर्ते :- त्रिशूल घाटे (अध्यक्ष), सागर शेंडे, योगेश कातोरे, अमोल नरडे, मंगेश आंबूरकर, ओम् नौकरकार, सज्जन शेंडे, गौरव चहारे, मयूर माणूसमारे, सुधाकर घाटे, अनुप कातोरे, रमेश शेंडे, राहुल घाटे, अमोल आंबूरकर, सागर कातोरे, चेतन नरडे, सचिन घाटे, रोहित मुंगले, जतिन गोटे, तनुष जानवे, गजुभाऊ वदनलवार, रविभाऊ करलूके, प्रांजल वंजारी, प्रशांत जुंजारे, रुपेश तडस, राहुल जानवे, सतीश नरडे, बबलू वंजारी आणि अक्षय जोगी.

सर्व कार्यकर्त्यांच्या झोकून देऊन केलेल्या कामामुळे हा ४८ वा वर्धापनदिन व रक्तदान सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. वरोरा शहरात मंडळाच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.