Home जिल्हा चंद्रपूरमध्ये वनहक्क दावेदार शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; प्रलंबित दाव्यांच्या तातडीने निपटारा करण्याची जोरदार...

चंद्रपूरमध्ये वनहक्क दावेदार शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; प्रलंबित दाव्यांच्या तातडीने निपटारा करण्याची जोरदार मागणी

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात वनहक्क दाव्यांच्या मागणीसाठी शेतकरी व ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाची दखल घेत आज प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेण्यात आल्या. वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी मी सदैव यांच्या सोबत आहे.



या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी सौ. वसुमना पंत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांचा लवकरात लवकर कायदेशीर व सकारात्मक पद्धतीने निपटारा करावा, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

“शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

यावेळी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व विविध प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने सकारात्मक पावले उचलावी.