Home Breaking News चंद्रपुरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष प्रतिबंधक मोहीम; आतापर्यंत ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई.

चंद्रपुरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष प्रतिबंधक मोहीम; आतापर्यंत ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई.

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधक मोहीम (Preventive Action Camp) आयोजित करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये शिबिर घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये धडक कारवाई करण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.



उपविभागनिहाय प्रतिबंधक कारवाईचा तपशील
💥 वरोरा (दिनांक १६/०७/२०२६) :- लागू कलमे (BNSS) १२६ व १२९, एकूण कारवाई (आरोपी संख्या) १०८
वरोरा (दिनांक २७/०८/२०२६) :-  लागू कलमे (BNSS) १२६ व १२९, एकूण कारवाई (आरोपी संख्या) ११२
चंद्रपूर (दिनांक ०३/०९/२०२६) :- लागू कलमे (BNSS) १२६ व १२९, एकूण कारवाई (आरोपी संख्या) १३५
राजुरा (दिनांक ०७/०९/२०२६) :- लागू कलमे (BNSS) १२६ व १२९, एकूण कारवाई (आरोपी संख्या) ७४
चिमुूर (दिनांक ०९/०९/२०२६) :-  लागू कलमे (BNSS) १२६ व १२९, एकूण कारवाई (आरोपी संख्या) ९९
एकूण :-५२८
या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून ब्रह्मपुरी व मूल उपविभागामध्ये गेल्या दोन दिवसांत विशेष प्रिव्हेन्टिव्ह कॅम्प आयोजित करण्यात येत असून, तेथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयित इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली जाईल. समाजात शांतता व सुरक्षेचे वातावरण टिकून राहावे यासाठी चंद्रपूर पोलीस दल कटिबद्ध असून समाजकंटक तसेच उपद्रवी घटकांवर अशा प्रकारची कडक कायदेशीर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील.