Home जिल्हा आनंद निकेतन महाविद्यालयात NSS विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान; श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश!

आनंद निकेतन महाविद्यालयात NSS विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान; श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश!

वरोरा, दि. १७ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आणि केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ या देशव्यापी अभियानाच्या पार्श्वभूमीवर, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक तरुण व उत्साही NSS विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



🙏अभियानाची ठळक वैशिष्ट्ये🙏

  • २ तास कठोर श्रमदान: सुमारे दोन तास चाललेल्या या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील कानाकोपऱ्याची स्वच्छता केली.
  • परिसर सफाई: परिसरात वाढलेले अनावश्यक गवत, झाडाझुडपे, पालापाचोळा तसेच इतर कचरा विद्यार्थ्यांनी झाडू, खुरपे व अन्य साधनांच्या साहाय्याने संपूर्णपणे हटविला.
  • सामूहिक जबाबदारीचा संदेश: स्वच्छता ही केवळ एका व्यक्तीची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची सामूहिक सामाजिक जबाबदारी आहे, असा मोलाचा संदेश या विद्यार्थ्यांनी कृरून दाखवून दिला.

🙏 मार्गदर्शन व नेतृत्व 🙏

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी सुरेश राठोड आणि पंचभाई मॅडम यांच्या प्रभावी नेतृत्वात हे अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर तर स्वच्छ व नीटनेटका झालाच, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वच्छतेची जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि सेवाभाव या मूल्यांची सुंदर रुजवणूक झाली.

युवकांचा सहभाग हा कोणत्याही सामाजिक परिवर्तनाचा कणा असतो, हेच आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या या कृतीतून सिद्ध केले आहे! 🇮🇳