भद्रवती:- भद्रवती तालुक्यातील मौजा सावरी येथे वन्यजीव वाघ आणि बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावरी हे गाव जंगल शेजारी असल्यामुळे गावात नेहमी बिबट्या येऊन बकरे, कोंबडे आणि कुत्रे घराच्या दारातून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी दिवसा सुमारे ११.०० वाजताच्या दरम्यान शेतीकाम करत असताना प्रफुल विश्वनाथ डडमल यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये शेतात जाण्याबाबत भीती निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांची वनविभागाकडे प्रमुख मागण्या:
- शेतशिवासातील वाघ, बिबट्या व इतर वन्यप्राण्यांना हुसकावून किंवा जंगलाकडील भागात पळवून लाडावे.
- गावाच्या समोताल जाळी लावून द्यावी.
- शेती कामाचे बैल वाघाने मारल्यास नुकसान भरपाई ८ दिवसात देण्यात यावी.
- वनविभागातर्फे दररोज उपाययोजना म्हणून ढोल व फटाके फोडून वन्यप्राण्यांना पळवून लावण्याचे सहकार्य करावे.
या समस्येचा तात्काळ प्रभावी निकाल लावून योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी विनंती सावरी येथील समस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




