Home जिल्हा वरोरा रोटरीचा नवा अध्याय: ‘नवे नेतृत्व, नवी स्वप्ने’ – पदग्रहण सोहळा आज!

वरोरा रोटरीचा नवा अध्याय: ‘नवे नेतृत्व, नवी स्वप्ने’ – पदग्रहण सोहळा आज!

वरोरा :- समाजसेवेचा वसा आणि ध्येयवादाची ऊर्जा घेऊन, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत कार्यरत रोटरी क्लब ऑफ वरोरा, इनरव्हील क्लब आणि रोटॅरॅक क्लब आज एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत.
२०२६-२७ या नवीन वर्षाचा ध्यास घेत, आज १८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता वरोरा येथील कटारिया मंगल कार्यालयात एका दिमाखदार पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात नवीन कार्यकारिणी सूत्रे हाती घेऊन वरोराच्या विकासासाठी आणि समाजकार्यासाठी सज्ज होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट ३०३० चे मानद सचिव श्रीनिवास लेले भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतिभा धानोरकर, आ. करणदादा देवतळे, डॉ. संदीप मुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रकल्प सचिव राजेश गढीकर मार्गदर्शन करणार आहेत.
👉  या सोहळ्यात रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून अभिजित मानियार, मानद सचिव अभिजित बोथले आणि कोषाध्यक्ष म्हणून सुनील आयाचित पदभार स्वीकारणार आहेत. तसेच इनरव्हील आणि रोटॅरॅक क्लबची नवीन टीमही कामाला सुरुवात करेल.
🙏 शुभेच्छा संदेश 🙏
“वरोरा रोटरीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आगामी वर्षासाठी ‘स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल’ तर्फे खूप खूप शुभेच्छा! आपले हे नवीन पर्व समाजसेवेत नवनवीन विक्रम प्रस्थापित करो, हीच सदिच्छा!”