वणी :- तिरळे कुणबी समाज संघटना, तालुका वणी यांच्यावतीने आज शनिवारी, १८ जुलै २०२६ रोजी स्थानिक ‘शेतकरी मंदिर‘ येथे ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन २०२४-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, समाज बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
🔷 कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल 🔷
👉 महिला आरोग्य तपासणी :- दुपारी ३:०० वाजल्यापासून.
👉 मुख्य कार्यक्रम :- दुपारी ४:०० वाजता.
👉 स्थळ :- शेतकरी मंदिर, वणी.
👉 स्नेहभोजन :- मुख्य कार्यक्रमानंतर लगेच.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. श्री. नारायणराव विश्वासरावजी देवडे हे भूषवणार आहेत. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून वणीचे तहसीलदार मा. श्री. निखिल धुळधर आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. डॉ. सचिन गाडे उपस्थित राहणार आहेत. तसेच, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. संगीताताई रा. खांडेकर, माजी संचालक मा. श्री. नरेंद्र पाटील ठाकरे आणि मा. श्री. बिपिन अनिलराव चौधरी (संचालक, साईकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, यवतमाळ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तिरळे कुणबी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, वणी यांच्यावतीने सर्व समाज बांधवांना या सोहळ्यास सपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




