वरोरा :- कौटुंबिक वादातून एका पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना वरोरा शहरात समोर आली आहे. शहरातील मेहता हॉल जवळील ‘चीरघर’ प्लॉट परिसरात ही भीषण घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
-: 🛑 नेमकी घटना काय 🛑 :-
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जीवतोडे आणि त्यांचा मुलगा गोलू जीवतोडे यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. काल, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात पियुष उर्फ गोलूने धारदार शस्त्राने किंवा हिंसक मार्गाने आपले वडील नामदेव जीवतोडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.व वडील वरून पडले व जखमी झाले असा देखावा केला होता. परंतु पोलिसांनी शहानिशा केल्यावर ती हत्या आहे. ही बाब समोर आली.
👉 उपचारादरम्यान मृत्यू.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नामदेव जीवतोडे यांना तातडीने उपचारासाठी वरोरा येथून चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या महत्त्वाच्या भागांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
👉 आरोपी मुलगा अटकेत.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी व LCB चंद्रपूर यांनी धाव घेतली. व अवघ्या काही तासांतच आरोपी मुलगा पियुष उर्फ गोलू जीवतोडे याला ताब्यात घेतले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास वरोरा पोलीस स्टेशनचे पथक करत असून, या हत्येचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे. पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने वरोरा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




