वणी :- अभिषेक किशोर भागडे ( वरोरा )
येथील शासकीय मैदानावर क्रिकेटवेड्या रसिक आणि खेळाडूंसाठी बहुप्रतिक्षित ठरलेल्या **’रात्रकालीन वणी प्रीमियम लीग मनसे चषक २०२६ (सीजन – ३)’चा भव्य आणि उत्साही वातावरणात प्रारंभ करण्यात आला. या शानदार क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले असून, वणीसह संपूर्ण परिसरात या स्पर्धेची मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
🔴 युवकांच्या जिद्दीला मिळणार व्यासपीठ 🔴
युवकांना खेळाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्यातील खिलाडूवृत्ती व जिद्द जिवंत ठेवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. लाखो रुपयांची भरघोस बक्षिसे असलेल्या या स्पर्धेचे नेटके नियोजन आयोजकांनी केले असून, याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. उद्घाटकांनी आपल्या भाषणात आयोजकांचे आभार मानत सर्व खेळाडूंना मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी बजावण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
🔴मान्यवरांची उपस्थिती 🔴
या उद्घाटन सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा ) चे संजयजी देरकर वनी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार प्रामुख्याने श्री. राजू उंबरकर (पक्षनेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना) विजयजी मुकेवारइर, ईशाद खान, फाल्गुन गोहकार, शैलेश ढोके,नदीम शेख,मनीष बत्रा
यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, क्रीडाप्रेमी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴 मैदानावर रंगणार ‘हाय-व्होल्टेज’ सामने 🔴
पुढील काही दिवस वणीच्या भूमीत क्रिकेटचा हा थरार रंगणार असून, विविध संघांमधील चुरस पाहायला मिळणार आहे. फ्लडलाईट्सच्या झगमगाटात होणाऱ्या या सामन्यांमुळे वणी शहरात जणू क्रीडा उत्सवाचेच स्वरूप प्राप्त झाले आहे.
“आयोजकांनी युवकांसाठी निर्माण केलेले हे व्यासपीठ खरोखरच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक गुणवत्तेला वाव मिळेल,” असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
🙏 जय विदर्भ 🙏




