Home महाराष्ट्र ⭕🙏 सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड🙏⭕

⭕🙏 सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड🙏⭕

माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत मोठी घडामोड घडली आहे. रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या बैठकीनंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी व प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर सर्वानुमते विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढत पक्षाला नव्या दिशेने नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर येणार आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.