वरोरा, : शहरात नगरपरिषद वतीने गेल्या आठवड्यापासून नालेसफाई बंद असल्याने शिवसेना पक्षाने तत्काळ कारवाई न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्याचा इशारा दिला. शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
शहरात नालेसफाई बंद असल्याने मच्छरांचा प्रजनन स्थळ तयार झाले असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. मुलं, ज्येष्ठ नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद केले. प्रशासन व सत्ताधारी पक्षाची उदासीनता असह्य झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.त्यामुळे तत्काळ नालेसफाई सुरू करा, कामगार व यंत्रसामग्री उपलब्ध करा, जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करा व नियमित वेळापत्रक जाहीर करा या मागण्या करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी यांच्या विरोधात नगर परिषद कार्यालयात ढोल बजावो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी नगरसेवक कुणाल रुयारकर,माजी नगरसेवक राजू महाजन,माजी नगरसेवक दिनेश यादव, , संदीप मेश्राम, अनिकेत काळे, जावेद शेख, युवासेना शहर प्रमुख चेतन सातपुते, मनीष दोहतरे, सुबोध कुरेकार, आशिष झाडे, विकास गंधारे, राजा थैम व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
🙏जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




