Home राजकारण ⭕🙏 आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश 🙏⭕

⭕🙏 आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश 🙏⭕

गोंडपिपरी आणि कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
२८.१० कोटींचा निधी मंजूर; आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला आमदार यश

✍️ अभिषेक भागडे | स्वतंत्र विदर्भ न्यूज, चंद्रपूर | दि. ०९ डिसेंबर

गोंडपिपरी आणि कोरपना तालुक्यातील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक घडामोड समोर आली आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठाम भूमिकेमुळे राज्य शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून या दोन्ही तालुक्यांसाठी तब्बल २८ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुरुवातीला पावसाचे अधिकृत निकष पूर्ण नसल्याचे सांगून नुकसान भरपाईतून या तालुक्यांना वगळण्यात आले होते. मात्र आमदार भोंगळे यांच्या प्रयत्नांमुळे हजारो शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे.

🔶 अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान

ऑगस्ट–सप्टेंबर २०२५ दरम्यान गोंडपिपरी आणि कोरपना तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने कापूस, सोयाबीन, भात, तूर या प्रमुख पिकांसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

गोंडपिपरी तालुका : ६४.०८ मि.मी. पाऊस

कोरपना तालुका : ६३.१० मि.मी. पाऊस

शासनाच्या ६५ मि.मी. निकषापेक्षा अत्यल्प फरकाने कमी पाऊस झाल्याने ही दोन्ही गावे सुरुवातीला भरपाई यादीतून वगळली गेली. परिणामी हजारो शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

🔶 आमदार भोंगळे यांचा आक्रमक पाठपुरावा

शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नावर आमदार देवराव भोंगळे यांनी तात्काळ शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तत्कालीन मुख्य सचिव राजेश कुमार

जिल्हाधिकारी, चंद्रपूर

जिल्हा कृषी अधीक्षक

यांना त्यांनी सविस्तर पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती स्पष्ट केली.
गोंडपिपरी येथे १९,६७६.६५ हेक्टर तर कोरपना येथे १३,४०१.१२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रत्यक्ष नुकसान झाल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

“पावसाचे मोजमाप निकषांपेक्षा किंचित कमी असले तरी शेतकऱ्यांचे नुकसान अब्जावधीचे आहे; त्यामुळे ‘विशेष बाब’ म्हणून मदत देणे अत्यावश्यक आहे,” अशी ठाम मागणी त्यांनी शासनासमोर मांडली.

🔶 शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आमदार भोंगळे यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत प्रस्ताव शासनाकडे पाठवला.

त्या अनुषंगाने राज्य शासनाने ०७ डिसेंबर २०२५ रोजी अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला.

या GR नुसार गोंडपिपरी आणि कोरपना येथील शेतकऱ्यांना २८.१० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

🔶 हजारो शेतकऱ्यांना दिलासा

या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यांतील पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या काळात आमदार भोंगळे यांनी दाखविलेल्या पुढाकाराचे शेतकरी वर्गातून विशेष कौतुक होत आहे.

🙏 जय विदर्भ 🙏

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
☎️ 9673574711
☎️ 8329889732