आज रोटरी क्लब वरोरातर्फे महारक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.
वरोरा ✍️ – अभिषेक भागडे
वरोरा :
रोटरी क्लब वरोरा यांच्या वतीने मिशन लाइफ अंतर्गत आज दिनांक ८ डिसेंबर, सोमवारी अत्यंत भव्य अशा महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील आनंद निकेतन महाविद्यालयात सकाळी ९ वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली असून, रोटरी क्लबचे हे सामाजिक कर्तव्यपर कार्य विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
रोटरी क्लब हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले आहे. त्याच परंपरेला अनुसरून यंदाच्या वर्षीचे हे महारक्तदान शिबिर तेरा जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या 111 रोटरी क्लबच्या संयुक्त उपक्रमाचा भाग आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा हा कार्यक्रम रोटरी क्लबने हाती घेतलेल्या *‘जीवनदायी मोहिमे’*चा मोलाचा टप्पा मानला जात आहे.
या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक सहभागी झाले असून, रक्तदात्यांना रोटरी क्लबतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अधिकाधिक लोकांनी पुढाकार घेऊन समाजहितासाठी रक्तदान करावे, यासाठी रोटरी क्लबने व्यापक जनजागृती केली होती.
रोटरी क्लब वरोरा चे अध्यक्ष योगेश डोंगरे, सचिव राहुल पाडवे, कोषाध्यक्ष देवेंद्र गावंदे, प्रकल्प प्रमुख धनेश्वर पिसाळ यांनी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले त्यामध्ये डॉ. मृणाल काळे सर प्रिन्सिपॉल आनंद निकेतन महविद्यालय
योगेश डोंगरवार
अध्यक्ष रोटरी क्लब वरोरा
अभिजित मणियार
पियु्श गुंडावार
सुनील आईचीत
अदनान सद्दीकोट
नितेश जयस्वाल
मनोज कोहळे. तसेच अभिषेक भागडे स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल संपादक व एकूण 55 लोकांनी रक्तदान केले.
रक्तदान हे महादान… समाजासाठीही जीवनदायी!
आजच्या या महाउपक्रमामुळे वरोरा शहरात सामाजिक बांधिलकीचे नवीन पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. —🙏जय विदर्भ🙏— { बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा☎️ 9673574711 ☎️ 8329889732 }




