वरोरा( अभिषेक भागडे )✍️ : रत्नमाला चौकातील खड्ड्यांचे बुजविणे वेगाने पूर्ण

आ. करण दादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली टोल व्यवस्थापनाची तत्परता; भाजप शहराध्यक्ष संतोषजी पवार यांनी पाहणी करून मानले आभार

वरोरा :
रत्नमाला चौक परिसरात नागरिकांना मोठा त्रास देत असलेले खड्डे अखेर बुजविण्यात आले. आमदार करण दादा देवतळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नंदुरी टोल व्यवस्थापनाशी सातत्याने संवाद साधत करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम आज वेगाने पूर्ण करण्यात आले.

शहरातील महत्त्वाच्या चौकात उभे राहून भाजप शहराध्यक्ष संतोषजी पवार यांनी स्वतः कामाची पाहणी केली. काम दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी संबंधित टोल व्यवस्थापकांशी वारंवार चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या पुढाकारामुळे तातडीने दुरुस्तीचे काम सुरू होऊन पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी टोल व्यवस्थापनाचे आभार मानले.

स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीत निर्माण होणारा अडथळा तसेच अपघातांची शक्यता वाढत होती. आज झालेल्या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आगामी दिवसांतही असेच जनहिताचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन संतोषजी पवार यांनी दिले.

—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा.☎️ 9673574711 ☎️ 8329889732 )