Home महाराष्ट्र Modi reversed his strategy on the opponents!:”फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण...

Modi reversed his strategy on the opponents!:”फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल…”

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काँग्रेसविरोधात कार्ड खेळले आहे. मोदींनी विरोधकांचा डाव आता त्यांच्यावरच उलटवला आहे. ‘जर आपण एकजूट राहिला नाहीत, तर काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल’, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटेल आहे. ते मंगळवारी महाराष्ट्रातील चिमूर येथील सभेला संबोधित करत होते. मोदी म्हणाले, “जर आपण एक राहिला नाही, तुमची एकजूट तुटली, तर सर्वातआधी काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून अथवा हिसकावून घेईल. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे.

समृद्धी कायम राहावी यासाठी आपण एकसंध राहायला हवे. या देशातील 10 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. काँग्रेसला त्यांना जातींमध्ये विभाजित करायचे आहे, जेणेकरून ते त्यांना कमकुवत करू शकतील. जर आदिवासी समाजात फूट पडली, तर हे लोक त्यांची ओळखच नष्ट करतील. काँग्रेसचे युवराज परदेशात हे बोलले होते. काँग्रेसच्या कटकारस्थानापासून स्वतःला वाचूवायचे आहे आणि एकजूट राहायचे आहे.

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात (Maharshtra) आता प्रचारासाठी साधारणपणे एक आठवडाच उरला आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची सक्रियताही वाढली आहे. याशिवाय, ‘बटोगे तो कटोगे’ आणि ‘एक हैं, तो सेफ हैं’ या घोषणांचाही परिणाम होताना दिसत आहे.