Home Breaking News FIRE : गोंदियात चारचाकी वाहन जळून खाक

FIRE : गोंदियात चारचाकी वाहन जळून खाक

गोंदिया, २७ मे, : गोंदिया कोहमारा मार्गावर चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे. गोंदियावरून चारचाकी वाहन हे लोहमाराच्या दिशेने जात होते. डव्वा गावाजवळ गाडीतून धुर निघाल्याने चालकांनी गाडी थांबवून खाली उतरला. गाडीने पेट घेतला हे लक्षात आल्यावर गाडीतील 8 नागरिकांना खाली उतरवले.(8 citizens were taken down.)         इतक्यात गाडीने संपुर्ण पेट घेतला होता. याची माहिती पोलिसांनी देण्यात आली असून सडक अर्जुनी येथिल अग्नी शमन विभागाची गाडी बोलाविण्यात आली. तो पर्यंत संपुर्ण गाडी जळून खाक झाली होती. या प्रकरणात कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी गाडी मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.