Home Breaking News वरोराकरांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध! १०० लाखांच्या कौशल्य विकास केंद्राच्या भूमिपूजनाने विकासाचा नवा...

वरोराकरांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध! १०० लाखांच्या कौशल्य विकास केंद्राच्या भूमिपूजनाने विकासाचा नवा अध्याय सुरू.

वरोरा :- सामान्य जनतेच्या विकासासाठी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुती सरकार आणि जनप्रतिनिधी सदैव कटिबद्ध आहेत, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वरोरा येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा! महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा खनिज निधीअंतर्गत तब्बल १००.०० लक्ष रुपये खर्चून साकारणाऱ्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा संजयराव देवतळे यांच्या हस्ते अत्यंत दणक्यात आणि उत्साहात संपन्न झाला.



विकासाच्या प्रवाहात तांत्रिक यंत्रणेची भक्कम साथ
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पंचायत समिती वरोराचे उपविभागीय अभियंता श्री. मोहन खराटे आणि सहायक अभियंता श्री. चंद्रशेखर गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. या विकासकामांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी यंत्रणाही पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे याप्रसंगी अधोरेखित झाले.



भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध व दणदणीत सोहळा
हा कार्यक्रम केवळ राजकीय सोहळा न राहता शिस्तबद्धतेचा उत्तम नमुना ठरला. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण नगरसेवक , युवा मोर्चाचे तडफदार सदस्य, महिला मोर्चाच्या सन्माननीय पदाधिकारी तसेच महिला वर्ग व सर्वसामान्य कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाला दाद दिली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याने विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर चोख उत्तर दिले आहे.



🙏 युवकांसाठी ठरणार गेमचेंजर 🙏या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामुळे वरोरा तालुक्यातील तरुण-तरुणींना हँड्स-ऑन ट्रेनिंग आणि रोजगार-स्वयंरोजगाराचे उत्तम पर्याय उपलब्ध होणार असून, हा प्रकल्प स्थानिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली वरोऱ्यात विकासाची ही धडाकेबाज घोडदौड अशीच अविरत सुरू राहणार, असा स्पष्ट संदेश या सोहळ्यातून मिळाला आहे.