वरोरा :- वरोरा नगरपरिषदेच्या कारभारातील अनास्था आणि ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:०५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेच्या विषय सूचीमध्ये शहराच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून, यामध्ये विषय क्र. ९ नुसार नगरपरिषद पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीकरिता येणारा खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्याबाबतचा मुद्दा अत्यंत चर्चेत आला आहे.
पाणीपुरवठ्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा आधार
शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करणे ही नगरपरिषदेची प्राथमिक व मूळ जबाबदारी असताना, या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी आता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीकडे हात पसरण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी आता सभेची मान्यता घेतली जाणार आहे.
💥 नागरिकांमध्ये संतापाची लाट💥
मौल्यवान निधी इतरत्र वळवण्याचा धोका १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी असतो. तो पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीसारख्या गोष्टींवर खर्च झाल्यास इतर विकासकामांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
💥 प्रशासकीय अपयशाचे लक्षण 💥
मूलभूत पाणीपुरवठा योजना स्वतंत्रपणे आणि सक्षमपणे चालवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होते. अत्यंत संवेदनशील विषयावर आज होणाऱ्या सभेत नगरसेवक काय भूमिका घेतात आणि याला कसा विरोध वा पाठिंबा दर्शवतात, याकडे संपूर्ण वरोरावासीयांचे डोळे लागले आहेत.




