चंद्रपूर :- एस. के. फिल्म प्रोडक्शन, चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धा – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडत असून, स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी शॉर्ट फिल्म व रील्सची निवड करण्यात आली आहे.
अंतिम फेरीचे स्क्रीनिंग (प्रदर्शनी) तपशील
💥 दिनांक :- १३ ऑगस्ट २०२६ वेळ :-सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ठिकाण :- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर
या स्क्रीनिंग सोहळ्यात निवडक शॉर्ट फिल्म्स आणि रील्सचे प्रदर्शन केले जाणार असून, सर्व स्पर्धा Nिकांनी व रसिकांनी वेळेवर उपस्थित राहून आपल्या व इतर कलाकारांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन तर्फे करण्यात आले आहे.
🙏 बक्षीस वितरण सोहळा 🙏
दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
👉 प्रमुख उपस्थिती :- मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार
यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
🙏 मान्यवरांच्या उपस्थितीचा सोहळा 🙏
कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार भूषवणार असून, या सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत:
👉 सौ. संगीता खांडेकर (महापौर, चंद्रपूर महानगरपालिका)
👉 श्री. हरीशजी शर्मा (जिल्हाध्यक्ष, भाजपा ग्रामीण)
👉 श्री. राहुलजी पावडे (नगरसेवक, चंद्रपूर महानगरपालिका)
👉 डॉ. मंगेशजी गुलवाडे (माजी जिल्हाध्यक्ष शहर, चंद्रपूर)
👉 श्री. बृजभूषणजी पाझारे (महामंत्री, भाजपा)
👉 श्री. प्रकाशजी धारणे (इको टुरिझम बोर्ड मेंबर)
👉 श्री. राजेश्वरजी सुरावार (सचिव, श्री माता कन्याका सेवा संस्था)
👉 सौ. नम्रता थेमस्कर (भाजपा कार्यकर्ती)
💥 आयोजक व सहयोग 💥
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एस. के. फिल्म प्रोडक्शन, चंद्रपूर यांच्या पुढाकाराने खालील सर्व, तसेच मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले आहे:
👉 देवा बुरडकर , प्रीतम स्त्रीबामडे, सुदेश भालेकर
विकास मोठे, सय्यद शफी,राकेश फुलझेले
कला व संस्कृतीप्रेमींनी या ऐतिहासिक आणि उत्साही सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.




