चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील मौजे येकोना येथे वेकोलीच्या (मेसर्स वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, माजरी क्षेत्र) प्रस्तावित ‘एकात्मिक ऐकोना – १ व २’ खुली खान (टप्पा-१) प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांच्या वतीने पर्यावरण विषयक जाहीर जनपरामर्श (जनसुनावणी) सूचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाढीव उत्पादनाचे नियोजन केले जात असून, यावर नागरिकांकडून आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
🙏 प्रकल्पाचे मुख्य व महत्त्वपूर्ण मुद्दे 🙏
प्रस्तावित प्रकल्प व कंपनी :– मेसर्स वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोली), माजरी क्षेत्र, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
प्रकल्पाचे नाव :– एकात्मिक येकोना – १ व २ खुली खान (टप्पा-१).
स्थळ :- मौजे येकोना, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
खान लीज क्षेत्र :- एकूण १६७९.३९ हेक्टर क्षेत्र.
उत्पादन क्षमता वाढ :- मागील/सध्याची क्षमता ३.८५ दशलक्ष टन प्रति वर्ष.
वाढीव उत्पादन क्षमता :- ४.१२५ दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी मोठी वाढ.
परवानगी व अर्ज प्रक्रिया :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), भारत सरकार यांच्या ११.०४.२०२२ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जनपरामर्शाकरिता अर्ज सादर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने १४ सप्टेंबर २००६ च्या अधिनियमान्वये व १ डिसेंबर २००९ च्या सुधारित अधिनियमान्वये ही प्रक्रिया हाती घेतली आहे.
🙏 जनसुनावणीत कोण नोंदवू शकते आक्षेप 🙏
सदर जनसुनावणी पर्यावरण विषयक मुद्यांवर असून, नियोजित प्रकल्पाच्या परिसरातील रहिवासी, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रकल्पामुळे विस्थापित होणारे रहिवासी किंवा प्रकल्पामुळे इतर प्रकारे प्रभावित होणारे नागरिक या प्रकल्पाबाबत आपली टीका-टिप्पणी किंवा आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवू शकतात.
👉 महत्त्वाची मुदत
कालावधी :- पर्यावरण विषयक सूचना, विचार, टीका-टिप्पणी तसेच आक्षेप लिखित स्वरूपात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत नोंदवणे अनिवार्य आहे.
आक्षेप व सूचना नोंदवण्याचे ठिकाण (पत्ता) :-
प्रादेशिक कार्यालय किंवा उप-प्रादेशिक कार्यालय
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन, पहिला माळा, बस स्टँड समोर, रेलवे स्टेशन रोड, चंद्रपूर.
☎️ दूरध्वनी क्रमांक :- ०१७२-२५१९६५.
ई-मेल :- rochandrapur@mpcb.gov.in / srochandrapur@mpcb.gov.in.
💠 पर्यावरण विषयक दस्तऐवज अभ्यासण्यासाठी उपलब्ध असलेली ठिकाणे.
💠 सदर प्रकल्पाची पर्यावरण विषयक माहिती असलेले दस्तऐवज खालील कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत अभ्यासता येतील:
1. पर्यावरण विभाग, १५ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई – ४०००३२.
2. सह-संचालक (जल प्रदूषण नियंत्रण), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्परतरू पॉईंट, २ रा व ४ था माळा, सिनेप्लॅनेट सिनेमा समोर, सायन सर्कल जवळ (पु), मुंबई – ४०००२२.
3. प्रादेशिक कार्यालय, नवीन सचिवालय बिल्डींग, समोर पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालय, VCA समोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
4. प्रादेशिक कार्यालय / उप-प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन, पहिला माळा, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर.
5. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.
6. जिल्हा परिषद, चंद्रपूर.
7. जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर.
8. उप-विभागीय कार्यालय वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
9. नगर परिषद वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
10. तहसिल कार्यालय वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
11. पंचायत समिती कार्यालय वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
12. ग्राम पंचायत कार्यालय येकोना, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
13. ग्राम पंचायत कार्यालय मार्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
14. ग्राम पंचायत कार्यालय चुरुखटी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
15. ग्राम पंचायत कार्यालय वनोजा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर.
16. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संकेतस्थळ: www.mpcb.gov.in




