Home जिल्हा बँक ऑफ इंडिया शाखा माढेळीच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे...

बँक ऑफ इंडिया शाखा माढेळीच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप.

माढेळी :-  दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ बँक ऑफ इंडियाच्या माढेळी शाखेच्या वतीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत आज दिनांक ०४-०८-२०२६ रोजी कर्मवीर विद्यालय, माढेळी येथे इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.



या कार्यक्रमाप्रसंगी बँक ऑफ इंडिया माढेळी शाखेचे शाखा प्रबंधक  मा. खुशाल मेहता साहेब व मा. कु. चेताली किन्हेकर मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक  मा. श्री. नरेंद्र बोरीकर सर यांनी शाखा प्रबंधक मा. खुशाल मेहता साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर मा. कु. चेताली किन्हेकर मॅडम यांचे स्वागत  कु. कुमरे मॅडम यांनी केले.



💥 कार्यक्रमातील ठळक मुद्दे 💥
मान्यवरांचे मार्गदर्शन :- शाखा व्यवस्थापक मा. खुशाल मेहता साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि बँक भविष्यातही अशाच प्रकारे गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. मा. कु. चेताली किन्हेकर मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यास करून आयुष्यात मोठे होण्याचा मोलाचा संदेश दिला.



💥 शाळेतर्फे कौतुक 💥
शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र बोरीकर सर यांनी बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. बँकेने सामाजिक बांधिलकी जपत गरीब विद्यार्थ्यांना केलेली ही मदत त्यांचे मनोबल वाढवणारी ठरेल, असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.



💥 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद 💥
मोफत स्कूल बॅग आणि साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व उत्साह दिसून येत होता. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी बँक ऑफ इंडिया माढेळी शाखेचे विशेष आभार मानले.