वरोरा :- भाजप नगरसेवकांचा पुढाकार; लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रात उपक्रम
करत या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणदादा देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व चॉकलेटचे वाटप केले.
अभ्यास केंद्रात आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनापासून अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होते, असे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अक्षय भिवदरे, प्रवीण चिमुरकर, संतोष पवार, नगरसेविका लता हिवरकर, मनीषा दानव, सीमा तडस, आशा आसेकर, नुपूर तेला, वर्षा पिसाळ, नलिनी आत्राम, लीना गयनेवार, शंभुनाथ वरघणे, सामाजिक कार्यकर्ते संजय दानव, संजय गयनेवार, रमेश हिवरकर, अमित आसेकर, भरत तेला, सचिन तडस, सुनील इंगळे, सागर आत्राम, चेतन बुरडकर, नूतन बुरडकर, योग शिक्षिका शीतल मिटकर, सार्थक नागपुरे तसेच संस्थेचे सचिव आशिष घुमे उपस्थित होते.
उपक्रमानंतर उपस्थित नगरसेवकांनी सामूहिक अभ्यास केंद्रात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.




