Home जिल्हा ‘बहुजन समाजाच्या भव्य मोर्चाच्या’ पूर्वतयारीसाठी आज वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...

‘बहुजन समाजाच्या भव्य मोर्चाच्या’ पूर्वतयारीसाठी आज वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात” नियोजन सभा “आयोजित करण्यात आली .

वरोरा :- उद्या, दिनांक २८ जून २०२६ रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बहुजन समाजाच्या भव्य मोर्चाच्या’ पूर्वतयारीसाठी आज वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित ‘नियोजन सभेला’ वरोरा शहराची प्रथम नागरिक म्हणून उपस्थित राहून मान्यवरांशी सविस्तर संवाद साधला. बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी उद्या निघणारा हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. हा मोर्चा शांततेत, शिस्तीत आणि पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी वरोरा आणि परिसरातील सर्व समाजबांधवांनी व कार्यकर्त्यांनी उद्या मोठ्या संख्येने चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मी या सभेच्या माध्यमातून केले आहे.
आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला वरोरा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रमुख पदाधिकारी, माझे सहकारी नगरसेवक आणि विविध क्षेत्रांतील वरिष्ठ मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लाभली. या सभेत प्रामुख्याने वरोरा नगर परिषद च्या  नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे,मा. राजूभाऊ चिकटे, जयंत टेमुर्डे  (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा), श्री. गजाननराव मेश्राम जी (माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक), मा. श्री. विलासराव टिपले जी (माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक), मा. श्री. शंभूनाथजी वरघने जी, मा. श्री. बंडूभाऊ देऊळकर जी, मा. श्री. राहुलभाऊ देवळे जी (विद्यमान नगरसेवक), मा. श्री. किशोरभाऊ डोमकावळे जी, मा. श्री. आशिषभाऊ ठाकरे जी, मा. श्री. दामोधरराव रुयारकर जी, मा श्री अभय भाऊ ठावरी मा.श्री. चंद्रकांतभाऊ मांडवकर जी, मा. श्री. गजाननराव शेळके जी, मा. श्री. विजयराव आंबेकर जी, मा. श्री. हरिभाऊजी भाजीपाले जी, मा. श्री. अशोकराव ठेंगे जी, मा. श्री. अनिलराव गहुकर जी आणि मा. श्री. सुधाकरराव चौखे जी उपस्थित होते.
सर्वांच्या एकजुटीच्या बळावर उद्याचा हा लढा नक्कीच यशस्वी होईल, हा विश्वास आजच्या नियोजन सभेने अधिक दृढ केला आहे. या यशस्वी नियोजनासाठी आणि सुंदर आयोजनासाठी मी आयोजक श्री. श्याम लेडे, श्री. राजुभाऊ चिकटे, श्री. पुरुषोत्तमभाऊ पावडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. चला, आपल्या हक्कासाठी उद्या चंद्रपूरकडे कूच करूया..