Home Breaking News ‘मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!’

‘मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!’

घाटंजी :-केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना आणि विकासकामांचा धडाका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी घाटंजी परिसरात राबवण्यात आलेल्या ‘विशेष जनसंपर्क अभियानाला’ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमदार मा. प्रा. श्री. राजुभाऊ तोडसाम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुका अध्यक्ष विजयसिंह बैस यांच्या पुढाकाराने, हे अभियान थेट लोकांच्या दारात पोहोचले आहे.
प्रत्यक्ष संवाद आणि विकासाचा आढावा
तालुका अध्यक्ष विजयसिंह बैस यांनी रामनगर, किन्ही, आमडी, फांदी, सायतखर्डा आणि चिखलवर्धा यांसारख्या विविध गावांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान, केवळ सरकारी योजनांची माहिती दिली नाही, तर नागरिकांच्या समस्या, त्यांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेत त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
विकास कामांचा ध्यास, जनसामान्यांचा विश्वास’
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील यशस्वी वाटचालीचे फलित आज ग्रामीण भागात दिसून येत आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निवारण करणे हेच या जनसंपर्क अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे या भेटीदरम्यान अधोरेखित झाले.
याप्रसंगी अनुप अपनावार, वर्षाताई पेंदोर, विजय कनाके, प्रमोद महल्ले, मुकेश चव्हाण, नरेश पेंदोर आणि प्रशिक लढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या या आक्रमक जनसंपर्क मोहिमेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, स्थानिक स्तरावर भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.