Home Breaking News चंद्रपुरात ‘खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ’तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व...

चंद्रपुरात ‘खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ’तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न

चंद्रपूर :- खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर यांच्या वतीने रविवारी, दिनांक ७ जून २०२६ रोजी सी.डी.सी.सी. बँक सभागृह (मुख्य शाखा), नागपूर रोड, चंद्रपूर येथे ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील खैरे कुणबी समाजातील नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक, सन २०२५-२६ या वर्षात शासकीय सेवेत निवड झालेले कर्मचारी आणि इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजुरा, मान. सुभाषभाऊ धोटे हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मान. करणदादा देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीचे प्राचार्य मान. धनंजय चाफले आणि शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शीचे मान. प्रा. पंकज नरुले यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून खैरे कुणबी समाज स्नेह व सां. मं. चंद्रपूरचे अध्यक्ष मान. डॉ. विजयराव देवतळे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच, मान. अरुणभाऊ धोटे (नगराध्यक्ष, राजुरा), मान. खुशलभाऊ बोंडे (ज्ये. सदस्य), मान. डॉ. आसावरी देवतळे (माजी सभापती, जि.प. चंद्रपूर), मान. पुंडलिक पाल (सहा. गटविकास अधिकारी), मान. मनोज कळसकर (प्रसिद्ध उद्योजक) व मान. डॉ. बी.के. लोणारे (ज्येष्ठ सदस्य) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर यांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले असून, ‘खैरे कुणबी कर्मचारी पुरुष बचत गट, चंद्रपूर’ यांचे विशेष सहकार्य लाभले होते