चंद्रपूर :-“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मिळणारी प्रेरणा ही केवळ शब्दांपुरती मर्यादित नसून, ती राष्ट्रनिर्माणाचा एक सशक्त राजमार्ग आहे,” असे प्रतिपादन विसापूर (ता. बल्लारपूर) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे या कार्यक्रमात सहभागी होत पंतप्रधान मोदींच्या विचारांमधून जनसहभाग, नवोपक्रम आणि विकासाचे नवे धडे गिरवण्यात आले.
👉 जनसेवेचा वसा आणि स्थानिक विकास
कार्यक्रमादरम्यान, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, “पंतप्रधान मोदीजींच्या विचारांना स्थानिक पातळीवर कृतीत उतरवणे, हीच खरी जनसेवा आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यात आजवर राबवलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे व प्रकल्पांना ‘मन की बात’मधूनच दिशा व प्रेरणा मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
👉 सर्वांगीण विकासाचा संकल्प ‘मन की बात’च्या माध्यमातून प्रेरित होऊन शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत काम करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
💥”हम साथ-साथ हैं” ची भावना💥
विसापूरसह संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी “हम साथ-साथ हैं” ही भावना जोपासत, सर्वांना सोबत घेऊन विकासयात्रा अधिक वेगाने पुढे नेण्याचा दृढ निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ🙏




