Home जिल्हा नगरपरिषद महासंघाच्या कार्यकारिणीत चंद्रपूरचा दबदबा; ५ पदाधिकारी बिनविरोध निवडून येत जिल्ह्याचा गौरव!

नगरपरिषद महासंघाच्या कार्यकारिणीत चंद्रपूरचा दबदबा; ५ पदाधिकारी बिनविरोध निवडून येत जिल्ह्याचा गौरव!

मुंबई :-दि. २७/०४/२६
मुंबई येथे आज पार पडलेल्या ‘नगरपरिषद महासंघ’ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याचा राज्यस्तरावर मोठा दबदबा दिसून आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक ५ पदाधिकारी कार्यकारिणीवर बिनविरोध निवडून देणारा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा ठरला आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली आणि राज्यातील ३६४ नगराध्यक्षांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या विजयामुळे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक जनसेवेवर जनतेचा असलेला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
👉 चंद्रपूरचे नवनियुक्त पदाधिकारी
या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याला मिळालेले यश खालीलप्रमाणे आहे:
⭕ उपाध्यक्ष :- श्री. अरुणजी धोटे (नगराध्यक्ष, राजुरा नगरपरिषद)
⭕ सदस्य :- श्री. निलेश ताजणे (नगराध्यक्ष, गडचांदूर)
⭕ सदस्या :-सौ. दीप्तीताई सोनटक्के (नगराध्यक्षा, घुग्घुस)
⭕ सदस्या :- सौ. एकताताई समर्थ (नगराध्यक्षा, मूल)
⭕ सदस्य :- सौ. अर्चना आशिष ठाकरे (नगराध्यक्ष वरोरा )
याच वेळी बदलापूरच्या नगराध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे यांची नगरपरिषद महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
🙏विकासासाठी कटिबद्ध🙏
या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना नवनियुक्त सदस्यांनी सांगितले की, “हा विजय आमच्या जनसेवेचा आणि काँग्रेस पक्षावरील विश्वासाचा आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्यातील तमाम नगरपरिषदांच्या विविध समस्या शासनादरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सदैव कटिबद्ध आहोत.”
या देदीप्यमान यशाबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

🙏 जय विदर्भ 🙏